करुणात्मक समाधान
महा एमटीबी   12-Feb-2019

 

 
 
 
आपल्याला जेव्हा ‘करुणे’चे महत्त्व समजते तेव्हाच खऱ्या अर्थाने आयुष्याचे विखुरलेले तुकडे एकत्र येतात. यासाठी अनेक वैचारिक आणि भावनिक गोष्टींची मूलभूत गरज आहे. आपण चुका करणारी माणसं आहोत, याचा बिनदीक्कत स्वीकार करता आला की, व्यक्ती स्वत:तल्या ‘स्व’ जवळ एक पाऊल पुढे सरकते.
 

दलाई लामा यांनी असं म्हटलं आहे की, compossion constitutes the base of human survival it's what makes human lives valuable & meaningfull. ‘करुणा’ माणसाच्या जगण्याचा महत्त्वाचा पाया आहे. ‘करुणा’ असल्यामुळेच मानवी आयुष्याचे मूल्य वाढते व ते अर्थपूर्ण होते. आपल्याला जेव्हा ‘करुणे’चे महत्त्व समजते तेव्हाच खऱ्या अर्थाने आयुष्याचे विखुरलेलेतुकडे एकत्र येतात. यासाठी अनेक वैचारिक आणि भावनिक गोष्टींची मूलभूत गरज आहे. आपण चुका करणारी माणसं आहोत, याचा बिनदीक्कत स्वीकार करता आला की, व्यक्ती स्वत:तल्या ‘स्व’ जवळ एक पाऊल पुढे सरकते. अल्बर्ट एलीस हा या विवेकनिष्ठविचारपद्धतीचा पाठपुरावा करणारा शास्त्रज्ञ व जनक. त्यांनी उल्लेख केला आहे की, ‘आपण सगळे तसे पाहिले, तर मानवी वागणुकीच्या बाबतीत परिपूर्णतेपासून बरेच दूर आहोत. बऱ्याचवेळा आपण जे काही करतो, मग ते संगीत असेल, खेळ असेल, विज्ञान असेल, त्यात प्राविण्य मिळवत असतो. पण त्यात आपण चुकाही करत असतो आणि अयशस्वीही होत असतो. आपल्यात काही अवगुण असतात तेव्हा काही उत्तम गुणही असतात आणि म्हणून आपण स्वत:लाच कुठल्याही अटीशिवाय स्वीकारणेही आवश्यक असते.’

 

अर्थात, या जगात आपण येतो व या जगाच्या नियमांचा, परिस्थितींचा, तत्त्वांचा, जीवनशैलीचा आपल्यावर काही प्रमाणात परिणाम होत असतो. त्या पार्श्वभूमीवर आपण जगाचे व आपले मूल्यमापन करत असतो. कधीकधी वस्तुस्थितीला न समजता केवळ भावूक होऊन आपण आपले मूल्यमापन करतो. जेव्हा या गोष्टी सकारात्मक असतात तेव्हा आपल्याला क्लेश होत नाहीत. पण जेव्हा आपण स्वत:च्या बाबतीत अंतर्मनातून टीका करू लागतो तेव्हा ती बाब चिंतेचीच आहे. अशावेळी स्वत:ला टोकाच्या या भूमिकेतून सुज्ञपणे बाहेर येऊन, स्वत:ला समजणे व समजून घेणे महत्त्वाचे आहे. ‘मी एक निरुपयोगी, निकामी माणूस आहे,’ असे विचार जेव्हा मनात येतात तेव्हा त्या विचारांचापुरोगामी परिणामसुद्धा नकारार्थीच असतो.अशा वेळी स्वत:लाच शहाणपणानेसमजावायला हवे की, मला हवी असलेली वा मी करत असलेली प्रत्येक गोष्ट माझ्या अपेक्षेनुसारव्हायलाच हवी, असा या जगाचा काही नियम नाही. म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना व कल्पनांना आपण थारा देऊ नये. विचार मनात आलेच,तर त्यांना शह द्यायला आपण शिकायला पाहिजे. आपल्या मनात येणाऱ्या चुकीच्या विचारांना नियंत्रित करण्याचे शिक्षण आपण आपल्या मनाला वेळोवेळी द्यायला हवे. आपली सदैव न्यायनिवाडा करायची सवय आपल्या मानसिकतेतून नष्ट करण्यास शिकायला हवे. आजच्या आधुनिक युगात आपल्या मनाची अंतर्गत ताकद आपण आपल्या सर्वांगिण विकासासाठी कशी वापरायची, हा सुज्ञपणा विकसित करता आल्यास आपली ऐहिक व हळूहळू अध्यामिक प्रगती होण्यास विलंब होणार नाही. स्वत:बद्दल समजून घ्यायचे म्हटले वा स्वत:मधील कमतरता ओळखायची म्हटले, तर माणसाकडे आत्मनिरीक्षण करण्याची सवय असायला पाहिजे. माणसं अंतर्मुख होतात तेव्हा सर्वसामान्यांकडे न आढळणारी मानसिक क्षमता त्यांच्यामध्ये असते. स्वत:बद्दलचे सत्य त्यांना समजते. स्वत:च्या स्वभाववृत्तीतून आपल्याला जसे पाहिजे तसे आपण नाही, म्हणजे आपण माणूस म्हणून अपूर्ण आहोत तसेच असुरक्षित आहोत, हे व्यक्तीचा कळू लागते. आपण स्वत:वर खूप टीका करू नये. याचा अर्थ असाही होतो की, आपण स्वत:ला महत्त्वाकांक्षेपासून दूर ठेवतो आहोत का, आपण विकासाची स्वप्ने पाहण्याचे टाळतो आहोत का, आपण अल्पसंतुष्ट आहोत का, या सर्व प्रश्नांच्या बाबतीत खरे तर यातले काहीच खरे नाही. आपल्या महत्त्वाकांक्षा, आपली ध्येये व आपलीस्वप्ने खूप महत्त्वाची आहेत. आपल्या आयुष्याचा पारा तर चढला पाहिजे, यात शंकाच नाही पण; आपण स्वत:चे खच्चीकरण करण्याची आवश्यकता नाही. स्वत:ला संतुष्ट ठेवून शांतपणे आपल्या आकांक्षाची जोपासनाआपण करू शकतो, हे लक्षात असू द्या. ते जास्त सोयीस्कर असेल, सुखदायक असेल.

 
 
- डॉ. शुभांगी पारकर 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/