राहुल का जिजा चोर है... नेटकऱ्यांनी धु-धु धुतले
महा एमटीबी   11-Feb-2019
 
 

मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे राहुल गांधी सोमवारी आणखी एका कारणासह ट्रोल झाले आहेत. यावेळी ते स्वतः याला कारणीभूत नसून त्यांचे भाओजी म्हणजे प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा हे कारणीभूत ठरले आहेत. सध्या सीबीआय चौकशीला सामोरे जाणाऱ्या वढेरा यांनी रविवारी एक भावूक पोस्ट शेअर करत भाजप सरकारने कशी माझ्या मागे चौकशीचा ससमिरा लावला असल्याचा कांगावा केला. नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावरच हा टीकेचा बुमरॅंग उलटला आहे.

 
 
 

सोमवारी सकाळपासून #RahulKaJijaChorHai, कारण #JijaSalaDonoChorHai, असे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. राहुलका जिजा म्हणजे रॉबर्ट वढेरा आणि राहुल गांधी आणि वढेरा हे दोघे चोर आहेत, असा हॅशटॅग वापरून राहुल गांधींना नेटकऱ्यांनी लक्ष्य केले होते. जमिन बळकावणारे हे लोक आपल्याला कसे शेतकरी म्हणवत आहेत, अशा आशयाचे ट्विटकरांनी केले आहे.

 
 
 
 

सरदार आर पी सिंह यांच्या नावाच्या पाटीवर गली गली मे शोर है जीजा साला चोर हैचा बॅनर दाखवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात व्हायरल झालेल्या लहान मुलांच्या सेल्फीतही महागठबंधनमध्ये एकत्र आलेल्या विरोधकांचे फोटो मॉर्फ करून दाखवण्यात आले आहेत. मोदींवर टीका करण्यापूर्वी वढेरा यांच्या चौकशीबद्दल तुमचे मत व्यक्त करा, असा टोला राहुल गांधींना या ट्विटमधून लावण्यात येत आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/