एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय
महा एमटीबी   11-Feb-2019


 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज ५१ वी पुण्यतीथी. देशभरात भाजपकडून आज विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपतर्फे समर्पण दिवसाची घोषणा केली आहे. सध्या देशात सुरू असलेल्या मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, ग्रामीण कौशल्य योजना, मुद्रा बॅंक योजना आदी कल्याणकारी योजनांमागे मोदी सरकारचा नेमका सिद्धांत काय, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतीथीनिमित्त जाणून घ्या या गोष्टी.

 

 

पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज ५१ वी पुण्यतिथी. विद्यार्थीदशेत १९३७ सालापासून त्यांनी रा.स्व.संघाचा कार्यकर्ता म्हणून काम पाहिले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर १९४२ साली ते रा.स्व.संघाचे प्रचारक बनले.


 
 

जनसंघाची पाळेमुळे मजबूत करणाऱ्यांपैकी ते प्रमुख नेते होते. डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर १६ वर्षे परिश्रमातून जनसंघाची उभारणी केली. पंडित दीनदयाल उपाध्याय देशाला एकात्म मानववादाचा सिद्धांत दिला. भारतीय जनता पक्ष आज त्याला आपली विचारधारा मानतो. एकात्म मानवतावाद हा भारतीय संस्कृतीचेच रूप आहे.

 
 

संपूर्ण जग हे भांडवलशाही आणि साम्यवादावर वादविवाद करत होते. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी तेव्हा याचा सूवर्णमध्य साधत एकात्म मानववाद मांडला. धर्म, अर्थ, काम मोक्षाकडे नेण्यासाठी असतात हा विचारही एकात्मवादात मांडला आहे.


 
 

मोदी सरकारच्या योजना सारकारण्यामागेही एकात्म मानवतावाद आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, स्टार्टअप इंडिया, मुद्रा बॅंक योजना, दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, मुद्रा बॅंक योजना, मेक इन इंडिया आदी योजनांमध्येही एकात्मवादाचा विचार केला आहे.


 
 

भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ सबका विकास ही घोषणाही एकात्मवादाच्या विचारातून आली. ६० वर्षांपूर्वी मांडलेली एकात्म मानवतावादाची संकल्पना आजही तंतोतंत लागू पडते. अखंड समाजाचा विचार करणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या चिंतनावर विचार करण्याची देशाला गरज आहे.माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/