भारत सर्वात वेगाने पुढे जाणारा देश : वर्ल्ड बॅंक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2019
Total Views |
 
 
 

वर्ल्ड बॅंकेकडून देशाच्या सोनेरी वाटचालीचा उल्लेख

 
 

नवी दिल्ली : २०२१ पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जरी घसरण होणार असली तरीही भारताची अर्थव्यवस्था अतिशय गतीमान असणार असल्याचा अंदाज बुधवारी वर्ल्ड बॅंकेने जाहीर केला आहे. देशाचा विकासदर हा ७.५ टक्क्यांवर असणार असल्याचेही वर्ल्ड बॅंकेने म्हटले आहे.

 

ग्लोबल इकोनॉमिक प्रोस्पेक्ट्समध्ये आलेल्या अहवालानुसार, भारताचा विकासदर २०१७पासून ६.७ टक्क्यांवरून वाढला. २०१८-१९ मध्ये तो ७.३ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचा अंदाजही त्यात व्यक्त करण्यात आला आहे. २०१९-२०, २०२०-२१ या आर्थिक वर्षांमध्ये तो ७.५ टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारत हा जगात वेगाने विकास करणाऱ्या राष्ट्रांपैकी एक असणार असल्याचा उल्लेख यात केला आहे. दरम्यान, २०२१ पर्यंत कोणत्याही देशाचा विकासदर हा ७ टक्क्यांवर असणार नाही, असेही भाकीत यात केले आहे.

 

या अहवालानुसार, केंद्र सरकारने लागू केलेल्या विविध आर्थिक सुधारणांचे परिणाम आता जाणवू लागतील, असे म्हटले आहे. भारताचा विकासदर ७.३ टक्क्यांवर ७.५ टक्क्यांवर पोहोचणार असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने सुक्ष्म लघु व मध्यम उद्योजकांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्ज सुविधा, मुद्रा योजना आदींमुळे गुंतवणूक वाढत असल्याने आर्थिक स्थिती मजबूत होणार असल्या अंदाज यात व्यक्त केला आहे.

 

जागतिक स्तरावर विकासदर घटणार !

 

जागतिकीकरणाला बसत चालेली खिळ, संकुचित व्यापारी धोरण, ब्रेग्झिट, अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि अन्य नकारात्मक घडामोडींमुळे जागतिक स्तरावर विकासदर घसरणार असल्याचेही म्हटले आहे. देशातील वित्तीय तुट आणि घरगुती मागणी वाढणार असल्याचे व्यक्त करण्यात आले आहेत. २०१९ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात असणार असल्याचे भाकीतही यावेळी करण्यात आले हे. या सर्वाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचेही यात म्हटले आहे. जगातील विकासदर २.९ टक्क्यांवर घसरणार आहे. २०१७ मध्ये तो ३ टक्क्यांवर होता.

 

चीनची पिछेहाट कायम

 

व्यापार युद्धामुळे घसरत चाललेला चीनच्या अर्थव्यस्थेचा आलेख आणखी खाली येणार असल्याचा अंदाज जागतिक बॅंकेने व्यक्त केला आहे. चीनचा विकासदर २०१८ मध्ये ६.५ टक्के आणि २०१९ आणि २०२० मध्ये ६.२ टक्के, २०२१ मध्ये तो ६ टक्क्यांवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २०१७ मध्ये तो ६.९ टक्के होता.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@