होमियोपॅथीक तपासणी (केस टेकिंग) - भाग-४
महा एमटीबी   09-Jan-2019
 
 
 

होमियोपॅथीक तपासणी ही एक तंत्रशुद्ध शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे, ज्याच्यामुळे रुग्णाच्या आजाराचे त्या आजाराच्या मूळ कारणाचे ज्ञान होमियोपॅथिक तज्ज्ञाला होते. या तंत्रशुद्ध तपासणीत अनेक गोष्टींची माहिती तज्ज्ञ करून घेतात. नाव, वय, पत्ता इत्यादी प्राथमिक माहितीनंतर मग सध्या होत असलेल्या तक्रारींबद्दल माहिती घेतली जाते. अशावेळी रुग्णाला त्याच्या भाषेत संपूर्ण त्रास वर्णन करण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.

 
 
काही लोक आपला त्रास वैद्यकीय संज्ञेमध्येच मांडतात. उदा. रुग्ण सांगतो की, मला मायग्रेन आहे किंवा मला आर्थ्ररायटिस आहे किंवा ॅसिडिटी आहे इत्यादी. अशावेळी केवळ वैद्यकीय संज्ञा लिहिता तज्ज्ञ त्यांना लक्षणांबद्दल विचारतात निश्चित तक्रार जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये आजार कुठल्या संस्थेशी निगडित आहे, (श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था इत्यादी) ते प्रथम पाहिले जाते. (location)  नंतर त्या आजाराच्या लक्षणांमधून कुठल्या प्रकारची संवेदना ही रुग्णाला होत असते, त्या संवेदनेचा अभ्यास केला जातो. (Sensation) त्याचबरोबर आजार वाढण्यास किंवा कमी होण्यास ज्या गोष्टी कारणीभूत होतात, त्या सुद्धा विचारल्या जातात. उदा. एखाद्या रुग्णाचे पायाचे सांधे बसताना किंवा उठताना दुखतात, मात्र चालताना अजिबात दुखत नाहीत त्यांना चालून बरे वाटते, तर एखाद्या रुग्णाला बसून आराम वाटतो तर चालताना भयंकर वेदना होतात. ही लक्षणे प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. कारण, ती प्रत्येकाच्या चैतन्यशक्तीत परावर्तित केलेली असतात. याला modalities' असे म्हणतात.
 

आजाराच्या बरोबरीनेच काही लक्षणे अशी दिसून येतात, ज्यांचा मुख्य आजाराशी त्याच्या लक्षणांशी थेट असा संबंध नसतो, परंतु तरीही ही लक्षणे दिसतात. अशा लक्षणांना होमियोपॅथीमध्ये फार महत्त्वाचे मानले जाते. कारण, ही लक्षणे त्या आजाराची नसून त्या माणसाची वैयक्तिक लक्षणे असतात आजारात चैतन्यशक्ती जी स्वतःहून निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असते, त्यावेळी ही लक्षणे शरीरावर मनावर दिसून येतात. यालाच concomitant' असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यात प्रत्येक लक्षण हे location, sensation, modalities, concomitant अशा प्रकाराने घेतले जाते. यालाचसंपूर्ण लक्षणअसे म्हटले जाते.

 

त्याच बरोबरीने प्रत्येक आजाराचा कालावधीही (Duration) पाहिला जातो. त्यातून तो आजार नवीन आहे की जुनाट आहे, हे कळून येते. आजाराची तीव्रता कधी जास्त, कमी होते, अचानक उद्भवणारी लक्षणे किंवा संथपणे उद्भवणारी लक्षणे अशाप्रकारे त्या लक्षणांचे वर्गीकरण केले जाते. असा आजार होण्यामागे सुरुवातीला दृश्य असे काही कारण आहे का, याचाही शोध घेतला जातो. तसेच आधी रुग्णाने कुठल्या प्रकारचे उपचार केले आहेत, ते सुद्धा पडताळले जाते. या सर्व गोष्टींचा सारासार विचार होमियोपॅथीच्या तपासणीमध्ये करण्यात येतो. पुढील भागात आपण याच तपासणीबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

 

(क्रमश:) 9869062276

 - डॉ. मंदार पाटकर 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/