आला ‘गल्ली बॉय’चा झकास ट्रेलर
महा एमटीबी   09-Jan-2019

 

 
 
 
 
 
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘गल्ली बॉय’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. एका गरीब वस्तीत राहणाऱ्या तरुणाची भूमिका रणवीर सिंह साकारत आहे. या सिनेमासाठी रणवीर सिंहचा नवा लूक पाहायला मिळेल. हा तरुण एका गरीब ड्राइव्हरचा मुलगा असून त्याला यशस्वी रॅपर बनायचे असते. रॅपर बनण्यासाठी त्याने केलेला संघर्ष या सिनेमात दाखविण्यात आला आहे. जीवनातील सगळेच दिवस काही सारखे नसतात. प्रत्येकाची चांगली वेळ येते. असे सांगण्याचा आशावादी प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे.
 
 

 

 

‘अपना टाइम आयेगा’ अशी या सिनेमाची टॅग लाइन आहे. दिग्दर्शिका जोया अख्तरने गल्ली बॉय या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी जोया अख्तरने ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘दिल धडकने दो या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. रणवीरच्या घराजवळ राहणाऱ्या एका गरीब मुस्लिम मुलीची भूमिका आलियाने साकारली आहे. अभिनेत्री कल्की कोचलिन या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या १४ फेब्रुवारी रोजी गल्ली बॉय हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/