गीता गोपीनाथ आयएमएफच्या सर्वोच्चपदी
महा एमटीबी   08-Jan-2019
 

नवी दिल्ली : मुळ भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदावर रुजू झाल्या असून या सर्वोच्चपदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध, जागतिकीकरणाला बसत असलेली खिळ आणि अनेक प्रमुख राष्ट्रांच्या संकुचित विचारसरणीमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोपीनाथ यांची नियुक्ती महत्वाची मानले जाते.

 

रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचीही या पदावर नियुक्ती झाली होती. गोपीनाथ या दुसऱ्या भारतीय आहेत. यापूर्वी या पदावर मौरी ओब्सफेल्ड या नियुक्त होत्या. ३१ डिसेंबर रोजी ते निवृत्त झाले. गोपीनाथ यांच्या नियुक्तीविषयी ऑक्टोबरमध्ये घोषणा झाली होती. गीता गोपीनाथ या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या अर्थतज्ज्ञ असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा दांगडा अनुभव आहे. जागतिक अर्थकारण, व्यापार डॉलर चलन संबंध आदी समजावून घेण्यामध्ये आपल्याला रस आहे.’, असे गोपीनाथ यांनी म्हटले आहे.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्समध्ये स्तरावर या सगळ्या संदर्भात सखोल अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गोपीनाथ यांनी म्हटले आहे. जागतिकीकरणापासून लांब जात असलेले देश हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसाठी मुख्य आव्हान असल्याचे गोपीनाथ यांनी म्हटले आहे. जागतिकीकरणासाठी सध्याची प्रतिकूल परिस्थिती गेल्या कित्येक वर्षात आली नव्हती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/