अभिषेक ऐश्वर्याने नाकारला ‘गुलाब जामुन’ हा सिनेमा?
महा एमटीबी   08-Jan-2019

 

 
 
 
 
 
मुंबई : अभिषेक आणि ऐश्वर्या ही बॉलिवुडमधील जोडी अनेक वर्षांनंतर ‘गुलाब जामुन’ या सिनेमातून पडद्यावर एकत्र दिसणार होती. त्यानिमित्ताने दोघांचेही चाहते खुश झाले होते. परंतु चाहत्यांच्या या आनंदावर लवकरच विरझण पडणार असल्याचे दिसून येत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या या दोघांनीही ‘गुलाब जामुन’ हा सिनेमा नाकारला असल्याची माहिती मिळाली आहे.
 

अभिषेक ऐश्वर्याला दीड वर्षांपूर्वी गुलाब जामुन या सिनेमाची ऑफर आली होती. ऐश्वर्याला या सिनेमाची कथा फार आवडली होती. परंतु दोघांनीही सिनेमाच्या कथेत छोटेसे बदल सुचविले होते. एकावृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार अभिषेक आणि ऐश्वर्याने हा सिनेमा नाकारला असल्याचे कळते. दोघांनी हा सिनेमा नाकरला असल्याची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु अभिषेक-ऐश्वर्या या जोडीने पुन्हा एकत्र काम करावे, अशी इच्छा त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. मणिरत्नम यांच्या ‘रावण’ या सिनेमात काही वर्षांपूर्वी दोघांनी एकत्र काम केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/