राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर
महा एमटीबी   08-Jan-2019

 

 
 
 
मुंबई : अभिनेता राकेश रोशन यांना घशाचा कॅन्सर झाला असल्याचे वृत्त त्यांचा मुलगा ह्रतिक रोशन याने दिले. मंगळवारी सकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट करून अभिनेता ह्रतिक रोशनने याबाबत माहिती दिली. अभिनेता राकेश रोशन कॅन्सरशी लढा देत असल्याचा धक्कादायक खुलासा ह्रतिकने केला. राकेश रोशन हे ६९ वर्षांचे आहेत. बॉलिवुडमधील एक यशस्वी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशी त्यांची ओळख आहे. मंगळवारी राकेश यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे.
 
 

 
 

राकेश यांनी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात जाण्यापूर्वी राकेश रोशन यांनी ह्रतिकसोबत व्यायामशाळेत व्यायाम केला. व्यायामानंतर काढलेला त्यांच्यासोबतचा आपला फोटो ह्रतिकने इन्स्टाग्रामवर शेअर केला. आज सकाळी मी माझ्या वडिलांना माझ्यासोबत एक फोटो काढण्याची विनंती केली. मला माहित होते की ते आज शस्त्रक्रियेच्या दिवशीदेखील व्यायामाला सुट्टी देणार नाहीत. कदाचित, मला माहित असलेले ते सर्वात कणखर पुरुष आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांना घशाचा कॅन्स झाल्याचे निदान झाले होते. परंतु आज ते पूर्ण स्फूर्तिनिशी या लढाईसाठी तयार आहेत. आमच्या कुटुंबात आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासारखे नेत्तृत्व लाभले, यासाठी आम्ही स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो!” असे ह्रतिकने त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

 
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून राकेश रोशन यांच्या प्रकृती स्वास्थासाठी तसेच ते लवकरात लवकर यातून बरे व्हावेत. अशी सदिच्छा व्यक्त केली. ह्रतिकच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टला उत्तर देत त्यांनी ट्विट केले की, प्रिय ह्रतिक, राकेश रोशन यांना प्रकृती स्वास्थासाठी मी प्रार्थना करतो. त्यांना उत्तम आरोग्य लाभो. ते एक लढवय्ये आहेत आणि मला खात्री आहे की ते आव्हानाला अत्यंत धैर्याने सामोरे जातील.
 

१९७० साली ‘घर घर की कहानी’ या सिनेमामधून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली. ‘खून भरी मांग’, ‘किंग अंकल’, ‘कोयला’, ‘करण-अर्जुन’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले होते. २००० साली ‘कहो ना प्यार है’ या सिनेमातून त्यांनी ह्रतिकला बॉलिवुडमध्ये लाँच केले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/