व्हिडीओ : ऐतिहासिक विजय आणि टीम इंडीयाचे भन्नाट सेलिब्रटीशन!
महा एमटीबी   07-Jan-2019नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑस्ट्रिलियाच्या भूमीवर ऑस्ट्रेलिया संघाला तब्बल ७२ वर्षानंतर लोळवळून ऐतिहासिक मालिका विजय मिळवला. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आल्यानंतर भारताच्या २-१ अशा मालिका विजयावर शिक्कामोर्तब झाले. यानंतर मात्र भारतीय संघाला आपला आनंद लपवता आला नाही. ऑस्ट्रेलिया भूमीवर मालिका विजयाची ७२ वर्ष वाट पाहावी लागली. अखेर विराटसेनेने ऑस्ट्रेलिया संघाला भारतासमोर गुढगे टेकविण्यास भाग पाडले.


विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी व प्रेक्षकांची एकच जल्लोष करत इंडिया...इंडिया...इंडिया चा नारा दिला. तर खेळाडूंनी भर मैदानातच ताल धरला.

 
 

मालिकेचा हिरो चेतेश्वर पुजाऱ्यालादेखील विराट सेनेने ठेका धरायला भाग पाडले.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/