आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण देणारा निर्णय क्रांतिकारक
महा एमटीबी   07-Jan-2019केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत


मुंबई : आर्थिकदृष्ट्या मागास सावर्णांना १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे. दलित सवर्ण यांच्यातील दरी मिटविण्यासाठी ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे त्यांनी अभिनंदन केले. ते यावेळी म्हणाले, "दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागास सावर्णांना स्वतंत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देणारा केंद्र सरकारचा निर्णय क्रांतिकारक ठरणारा आहे."

 

देशभरातील ब्राह्मण ; मराठा ; जाट ;राजपूत; गुज्जर;पटेल; लिंगायत आदी सवर्ण समाजातील आर्थिक दृष्ट्या मागसांना आर्थिक निकषावर स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण देण्यात यावे मात्र दलित आदिवासी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी आपण एनडीएच्या बैठकीत चार वेळा केली असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली मागणी मान्य झाली असून आर्थिक दृष्ट्या मागास सावर्णांना स्वतंत्र प्रवर्ग करून १० टक्के आरक्षण देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे आठवले म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/