‘इस्लामचा त्याग केल्यास घरचे मारून टाकतील’
महा एमटीबी   07-Jan-2019
 

बॅंकोक : थायलंडची राजधानी बँकॉक आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदी अरेबियातील १८ वर्षाच्‍या तरुणीला ताब्यात रविवारी ताब्यात घेण्यात आले. या तरुणीचे नाव रहाफ महंमद अल कुनान असून ती नास्तिक असल्याचे सांगत असून घरचे मला या कारणासाठी मारून टाकतील, असे तिचे म्हणणे आहे. रहाफ सौदी अरेबियातील एका गर्भ श्रीमंत उद्योगपतीची मुलगी आहे.

 

वयाच्या १६ व्या वर्षीच मी इस्लामचा त्याग केला असून मी नास्‍तिक आहे आणि हे घरी समजल्यास मला मारून टाकतील, अशी भीती तिने व्यक्त केली. दरम्यान थायलंडमध्ये आश्रय देण्याची मागणी केली होती आहे. पण थायलंड सरकारने फेटाळून लावल्याने अडचण निर्माण झाली आहे. दरम्यान तिचा पासपोर्टही सौदी दुतावासाने रद्द केला आहे. त्यामुळे रहाफला व्हाया कुवेत सौदी अरेबियामध्ये परत पाठविण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

 

इस्लाम कुटुंबाचे जाचक नियम, तसेच बंधनांमधून मुक्तता हवी असल्याने घरातून पळून जाणे हा एकच पर्याय माझ्याजवळ पर्याय होता, असे तिने सांगितले आहे. रहाफने या प्रकरणाविषयी एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली असून तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली आहे. ती म्हणते, एकवेळा मी असेच केस कापले होते. त्‍यावेळी घरातील लोकांनी मला सहा महिने घरातच बंद करुन ठेवले. माझे कुटुंब खूप निष्‍ठूर आहे. मला त्‍यांच्‍या जाचातून मुक्‍ती हवी आहे.

 
 
 
 

रहाफने ट्विटवरही याविरोधात आवाज उठवला आहे. "जे लोक मी स्‍त्री असल्‍याचा सन्‍मान कत नाही. त्‍यांच्‍यापासून मी लांब आणि स्‍वतंत्र राहणार आहे. माझ्‍यासोबत माझ्‍या कुटुंबाने वाईट व्‍यवहार केला आहे व याचे पुरावे माझ्‍याकडे आहेत." असे तिने म्हटले आहे. रहाफने संयुक्‍त राष्‍ट्र संघटनेकडेही रहाफने मदत मागितली आहे.

 
 
 

मी कुवेतपर्यंत कुटुबियांसोबत कारने आले होते. पहाटे चारच्या सुमारास कुटुंबातील सर्व सदस्‍य झोपले होते. तेव्‍हा मी ठरवले की, माझ्‍याजवळ घरातून बाहेर पडण्‍याची व सुटका मिळवण्‍याची हीच संधी आहे. मी ऑस्‍ट्रेलियाला जाण्‍याचे ठरवले होते कारण तेथे टूरिस्‍ट व्हिसा मिळवण्‍याची पद्धत सोपी आहे. त्‍यामुळे ऑस्‍ट्रेलियाचे तिकीट काढले. तेथे जाऊन आश्रय मागण्याचा विचार केला होता.”, अशी पळून जाण्यामागची कहाणी तिने सांगितली आहे.

 

ती म्‍हणाली की, मी फोनच्‍या माध्‍यामातून बर्‍याच वकिलांच्‍या संपर्कात होते. मात्र सोमवार (ता. ७) सकाळपर्यंत मला त्‍यांच्‍याकडून काहीच सकारात्‍मक उत्तर मिळाले नाही. कुवेतच्‍या एअरलाईन्सने मी बँकॉकमध्‍ये पोहचले. यानंतर माझा पासपोर्ट ताब्यात घेण्‍यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/