गुंतवणूकदारांना आशा, शेअर बाजार तेजीत
महा एमटीबी   07-Jan-2019
 

मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीलाच गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे भारतीय शेअर बाजार वधारला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १५५.०६ अंशांनी वधारत ३५ हजार ८५० अंशांवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४४.४५ अंशांनी वधारत १० हजार ७७१.८० वर बंद झाला. दिवसभरात निफ्टी १०५ अंशांनी वधारला होता.

 

जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, स्थानिक गुंतवणूकदारांचा सकारात्मक पवित्रा यामुळे बाजारात तेजी दिसून आली. एक्सिस बॅंक आणि इन्फ्राटेलचा शेअर २.५ टक्क्यांनी वधारला. सेन्सेक्समध्ये २० आणि निफ्टीतील सेन्सेक्समध्ये २० आणि निफ्टीतील ३० शेअर तेजीत दिसून आले. इंडियाबुल्स फायनान्सचा शेअर ४.५६ टक्क्यांनी घसरला.

 

निफ्टीमध्ये एक्सिस बॅंक, इन्फ्राटेल, टाटा मोटार्स, टायटन, ग्रासिम आदी शेअर वधारले तर इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, बजाज ऑटो, डॉ. रेड्डी, येस बॅंक, आयशर मोटार्स आदी शेअर घसरले. विश्लेषकांच्या मते अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्धाचा तणाव मावळण्याचे संकेत मिळाले असल्याने सोमवार आणि मंगळवारी अंतर्गत चर्चा होणार आहे. सोमवारी बाजार खुला होताच पैशांनी ३३ मजबूत झाल्यानंतर ६९.३९ स्तरावर कामगिरी करत होता. डॉलरमध्ये झालेल्या विक्रीमुळे रुपया सावरण्यास मदत झाली. सोमवारी ६९.७२ रुपयांवर बंद झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/