फेसबुक लाइव्ह करत तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
महा एमटीबी   07-Jan-2019

 

 
 
 
 
लातूर : लातूरमधील एका तरुणीने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वृषाली सूर्यवंशी असे या तरुणीचे नाव आहे. रात्री दोनच्या सुमारास वृषालीने फेसबुक लाइव्ह केले होते. या फेसबुक लाइव्ह दरम्यान डास मारण्यासाठी वापरण्यात येणारे गुड नाइट हे विषारी द्रव्य वृषालीने प्राशन केले.
 
 
 
 

वृषाली सूर्यवंशी ही आंबेडकरवादी संघटनेत सक्रिय होती. लातूरमधील औसा रोड परिसरात राहणारी वृषाली ही पँथर सेनेसाठी काम करत होती. संघटनेतील पदावर ती कार्यरत होती. संघटनेतील पदाचा तिने नुकताच राजीनामा दिला होता. काही लोक तिला त्रास देत असल्यामुळे आत्महत्येचे हे पाऊल ती उचलत असल्याचे तिने या फेसबुक लाइव्हमध्ये नमूद केले होते. संघटनेतील काही लोकांशी तिचा वाद सुरु होता. वृषालीचे फेसबुक लाइव्ह पाहणाऱ्या काही सतर्क नागरिकांनी तातडीने पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली आणि वृषालीला रुग्णालयात दाखल केले. वृषालीची प्रकृती आता स्थिर आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर फेसबुकवरून ती लिंक हटविण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/