फिरकीने केली ऑस्ट्रेलियाची दैना
महा एमटीबी   05-Jan-2019सिडनी : तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३६ अशी धावसंख्या केली. भारताने केलेल्या ६२२ धावांचा पाठलाग करताना रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाला जेरीस आणले. पहिल्या सत्रात आक्रमक सुरुवात करणाऱ्या कांगारुचा डाव दुसऱ्या सत्रात गडगडला. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे तिष्य सत्रात खेळ थांबवला. ऑस्ट्रेलियाचा पीटर हँड्सकॉम्ब हा २८ आणि पॅट कमिन्स हा २५ धावांवर खेळत होता.

 

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात चांगला संघर्ष केला. हॅरिसच्या अर्धशतकासह १२२ वर १ अशी स्थिती होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्या सत्रात हॅरिसला ७९ वर बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला डाव सावरता आला नाही. दुसरे सत्र संपले तेव्हा १९८ वर ५ अशी अवस्था झाली. दिवसाचा खेळ थांबवला तेव्हा जडेजाच्या नावावर २ तर कुलदीपच्या नावावर ३ विकेट जमा होत्या. त्याव्यतिरिक्त मोहम्मद शमीने १ विकेट घेतली. ऑस्ट्रेलिया संघ अजूनही ३८६ धावांनी पिछाडीवर आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/