इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सवाला सुरुवात
महा एमटीबी   05-Jan-2019मराठी चित्रपट खरवसला मिळाला उदघाट्नचा मान


नवी दिल्ली :इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सवा'ला सुरुवात झाली असून यामध्ये एकूण १० मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्यावतीने येथील सिरीफोर्ट ऑडिटोरियम मध्ये ४ ते १३ जानेवारी २०१९ दरम्यान इंडियन पॅनोरमा चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्या हस्ते शुक्रवारी महोत्सवाचे उद्घाटन असून मराठी चित्रपट खरवसआणि वोलूया मल्याळमचित्रपटाने महोत्सवाची सुरुवात झाली.

 

दहा दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवात एकूण ४७ चित्रपट दाखविण्यात येणार असून यात १० मराठी चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शेखर रणखंबे दिग्दर्शित पाम्फलेटआणि गौतम वझे दिग्दर्शित आईशप्पथचित्रपट दाखविण्यात आले. तिसऱ्या दिवशी रविवारी नितेश पाटणकर दिग्दर्शित ना बोले वो हराम’, मंगळवारी सकाळच्या सत्रात स्वप्नील कपुरे दिग्दर्शित भर दुपारीव याच सत्रात आम्ही दोघीहा प्रतिमा जोशी दिग्दर्शित चित्रपट तर तर दुपारच्या सत्रात प्रसन्न पोंडे दिग्दर्शित सायलेंट स्क्रिमचित्रपट दाखविण्यात येणार आहे.

 

गुरूवार दिनांक १० जानेवारी ला सायंकाळच्या सत्रात सुहास जहांगिरदार दिग्दर्शित एस आय एम माऊलीतर शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात निपुन धर्माधिकारी दिग्दर्शित धप्पाहा चित्रपट आणि शनिवारी सकाळच्या सत्रात मेधपर्णव पवार दिग्दर्शित हॅप्पी बर्थडेचित्रपट दाखविण्यात येणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/