आता मोदींवर येणार चित्रपट
महा एमटीबी   04-Jan-2019मुंबई : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा चरित्रपट चर्चेत आहे. यातच आता पंतप्रधान पंतप्रधान मोदींवर चरित्रपट येणार आहे. यामध्ये मोदींची भूमिका विवेक ओबोरॉय साकारणार असून 'सरबजीत' आणि 'मेरी कॉम' फेम ओमंग कुमार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर ७ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर जानेवारी महिन्यामध्येच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव 'पीएम नरेंद्र मोदी' असेच सांगण्यात येत आहे.

 

बाळासाहेब ठाकरे आणि मनमोहन सिंग यांच्यानंतर आता पंतप्रधान मोदींच्या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ओबेरॉय साकारत असल्यामुळे चाहत्यांना त्याच्या पहिल्या लूकची प्रतिक्षा आहे. चाहते आणि भाजप कार्यकर्ते विवेक ओबेरॉयला या लूकमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे. चित्रपटाची कथा मोदींच्या संघर्षावर आधारित असणार की राजकीय परिस्थितीवर याबद्दलची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/