भारताने रचला ६२२ धावांचा डोंगर
महा एमटीबी   04-Jan-2019


 


सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामान्यांमधील दुसरा दिवस हा पुजारा आणि पंतच्या फलंदाजीने सजवला. पुजाराचे द्विशतक अवघ्या ७ धावांनी हुकले. पुजाराच्या १९३ तर रिषभ पंतच्या नाबाद १५९ धावांमुळे भारताला ६२२ धावांचा डोंगर रचण्यास मदत झाली. ७ बाद ६२२ अशी धावसंख्या असताना भारताने डाव घोषित केला.

 

पंतने १८९ चेंडूत १५९ धावा केल्या, ज्यामध्ये १५ चौकार आणि १ षटकराचा समावेश आहे. तर चेतेश्वर पुजाराचे द्विशतक ७ धावांनी हुकले. त्याने ३७३ चेंडूत १९३ धावा पूर्ण केल्या आहेत. त्यात २२ चौकारांचा समावेश आहे. त्याला नॅथन लॉयनने बाद केले. हनमा विहिरीने देखील ४२ धावांचे आणि रवींद्र जडेजाने ८१ धावांचे योगदान दिले. जडेजा आणि पंत यांनी सातव्या विकेटसाठी २०४ धावांचे अमूल्य भागीदारी केली. भारताने डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद २४ असून मार्कस हॅरिस १९ तर उस्मान ख्वाजा ५ धावांवर नाबाद खेळत आहेत.

 

संबंधित बातमीसाठी क्लिक करा

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/