कपिल देव यांच्या बायोपिकमध्ये दिसणार ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता
महा एमटीबी   31-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : १९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. यावर आधारित ‘८३’ हा सिनेमा येणार आहे. अभिनेता रणवीर सिंह या सिनेमात माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या सिनेमात त्याकाळातील इतर क्रिकेटपटूंच्या व्यक्तिरेखा कोणते कलाकार साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता एकापाठोपाठ एक या सिनेमातील कलाकारांची नावे समोर येत आहेत.
 
 
 
 

भारतीय माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची व्यक्तिरेखा एक दाक्षिणात्य अभिनेता साकारणार आहे. सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या दाक्षिणात्य अभिनेत्याचे नाव जाहीर केले आहे. दाक्षिणात्य अभिनेता जीवा हा कृष्णमाचारी श्रीकांत यांची व्यक्तिरेखा साकारणार असून त्याने त्या दृष्टीने तयारीही सुरु केली आहे. हुबेहुब कृष्णमाचारी श्रीकांत यांच्यासारखे दिसण्यासाठी जीवा सध्या व्यायामशाळेत स्वत:वर प्रचंड मेहनत घेत आहे. आतापर्यंत जीवाने या भूमिकेसाठी ७ किलो वजन कमी केले आहे. कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. पंजाबी अभिनेता एमी विर्कदेखील ‘८३’ या सिनेमात दिसणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/