सिने-नाट्य कलाकार दिनेश साळवी यांची एक्झिट
महा एमटीबी   31-Jan-2019


 


मुंबई : प्रसिद्ध मराठी लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक दिनेश साळवी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ते ५३ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली जाण्याने सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी रात्री मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकात चालताना अचानक हृदयविकाराचा झटका आला.

 

दिनेश साळवी यांनी सीआयडी मालिकेमध्ये काम केले होते. अनेक मालिकांमध्ये ते छोट्या भूमिका करायचे. अनेक नाटकांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. महाविद्यालयीन एकांकिकेचे दिग्दर्शनदेखील त्यांनी केले होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामधील रंगभूमीवर काम करणाऱ्या तरुण कलावंतांना धक्का बसला आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/