टीव्हीवर पुन्हा अवतरणार ‘हम पांच’
महा एमटीबी   31-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : ‘हम पांच’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. नव्वदीच्या दशकातील अनेक मालिकांपैकी ही एक सुपरहिट मालिका होती. माथुर दांपत्य आणि त्यांच्या पाच मुली त्यांच्या जीवनात घडणाऱ्या अनेक रंजक घडामोडी यांवर आधारित ही विनोदी मालिका होती.
 

‘हम पांच’ या नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय मालिकेने एका ठराविक कालावधीनंतर प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेचा चाहतावर्गही मोठा होता. हम पांच फिर से’ असे या मालिकेचे नवे नाव असणार आहे. नव्या रुपात ‘हम पांच’ प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने यात अनेक नवे चेहरे दिसणार आहेत. अभिनेत्री जयश्री व्यंकटरमणा या मालिकेत काजोल भायची भूमिका साकारणार आहे. जयश्रीने स्वत: या भूमिकेविषयी माहिती दिली. अभिनेत्री अंबिका सप्रे राधिकाची भूमिका साकारणात आहे.

 

अनेक नव्या चेहऱ्यांचा शोध या मालिकेसाठी सध्या सुरु आहे. यावर्षी मे महिन्यापर्यंत ‘हम पांच फिर से’ टीव्हीवर सुरु होईल. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. १९९५ ते २००६ या कालावधीपर्यंत ‘हम पांच’ ने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. अशोक सराफ, प्रिया तेंडुलकर, राखी टंडन, भैरवी रैचुरा, वंदना पाठक, विद्या बालन हे कलाकार या मालिकेचा भाग होते. आता नवीन कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळणार का? हे पाहण्यासाठी मालिका सुरु होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/