‘व्हॉट्सअप लव्ह’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
महा एमटीबी   30-Jan-2019

 


 
 
 
मुंबई : ‘व्हॉट्सअप लव्ह’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री अनुजा साठे-गोखले या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये या दोन्ही कलाकारांनी काम केले आहे. ‘व्हॉट्सअप लव्ह’ या सिनेमाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन हेमंतकुमार महाले यांनी केले आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
 

‘व्हॉट्सअप लव्ह’ या सिनेमाचे कथा आजच्या काळातील प्रत्येकाच्या आयुष्याच्या जवळ जाणारी आहे. व्हर्चुअल वर्सेस रिअॅलिटी, व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडियाचा वापर करताना, व्हर्चुअल जगात वावरताना, कृत्रिम संबंध सांभाळताना, एकमेकांच्या भावभावना जोपासताना, होणारी तारेवरची कसरत. भौतिक सुखाचा पाठलाग करताना हरवत चाललेला खरेपणा. त्यामुळे येणारा एकाकीपणा हे या सिनेमातून दाखविण्यात आले आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये ‘व्हॉट्सअप लव्ह’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. व्हॉट्सअप वापरणाऱ्या प्रत्येकाला हा सिनेमा पाहून आनंद होईल.” असा विश्वास हेमंतकुमार महाले यांनी व्यक्त केला आहे. येत्या ५ एप्रिल रोजी ‘व्हॉट्सअप लव्ह’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/