कमलनाथ सरकार नमले; ‘वंदे मातरम’ वरुन ‘युटर्न‘
महा एमटीबी   03-Jan-2019


भोपाळ : वंदे मातरम् म्हणण्यास राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर बंदी घालणारे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अखेर नमते घेत राज्य सरकारतर्फे वंदे मातरम् हे अधिक आकर्षक करणार आहेत. राज्य सरकारी कार्यालयांमध्ये आता पोलीस बॅंण्डसह राष्ट्रगीतही म्हटले जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य जनताही वंदे मातरम् गायनात सहभागी होऊ शकणार आहे.

 

मध्य प्रदेशच्या सचिवालयात अनेक वर्षांपासून वंदे मातरम् म्हणण्याची पद्धत आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रगीतही म्हटले जाते. मात्र, कॉंग्रेसने सत्तेचा कौल मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ही परंपरा खंडीत करण्याचा प्रयत्न केला. अखेर भाजप नेत्यांनी या गोष्टीचा विरोध करत कॉंग्रेसवर निशाणा साधला.

 

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी कॉंग्रेसवर टीका करत कमलनाथ आणि कॉंग्रेसी नेत्यांना राष्ट्रगीताची रचना माहिती नसेल किंवा तसे करण्यास त्यांनी लाज वाटत असल्यास आम्ही वल्लभ भवनात वंदे मातरम म्हणून पण परंपरा खंडित करू नका, अशा शब्दांत निशाणा साधला.

 

या विरोधानंतर कमलनाथ सरकारने घुमजाव करण्यास सुरुवात केली असून यानंतर हिन्याच्या कार्यालयीन कामाच्या पहिल्या दिवशी सकाळी पावणे अकरा वाजता पोलीस बँड पथक भोपाळस्थित शौर्य स्मारक वल्लभ भवनपर्यंत मार्च यानंतर वल्लभ भवनजवळ वंदे मातरम् राष्ट्रगीत म्हटले जाईल. सरकारी कर्मचारी, अधिकारी आणि सर्वसामान्य जनताही यावेळी सहभागी होणार आहे. दर महिन्याच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी वंदे मातरम् गाण्याची परंपरा २००५ ध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांनी सुरू केली.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/