यावर्षी बॉलिवुडमध्ये होणार या स्टारकिड्सची एन्ट्री
महा एमटीबी   03-Jan-2019

 

 
 
 
 
 
मुंबई : २०१९ मध्ये बॉलिवुडमध्ये काही नवे चेहरे दाखल होणार आहेत. हे नवे कलाकार बॉलिवुड कलाकारांचे स्टारकिड्स आहेत. गेल्या वर्षीदेखील काही स्टारकिड्सनी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. यंदादेखील स्टारकिड्सची ही नवी फौज बॉलिवुडमध्ये दाखल होणार आहे. यंदाच्या या स्टारकिड्सवर टाकलेली एक नजर...
 

अनन्या पांडे

 
 
 

 
 

आपल्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता चंकी पांडे याची कन्या अनन्या पांडे स्टुडंट ऑफ द इयर : २’ या सिनेमातून पदार्पण करत आहे. अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री तारा सुतारिया हे अनन्याचे या सिनेमात सहकलाकार असणार आहेत. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमाचा हा सिक्वेल आहे.

 

खुशी कपूर

 
 

 
 

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर हिने गेल्या वर्षी बॉलिवुडमध्ये ‘धडक’ या सिनेमातून पदार्पण केले होते. जान्हवीच्या पाठोपाठ तिची लहान बहिण खुशी कपूर ही देखील यावर्षी बॉलिवुडमध्ये येऊन धडकणार आहे. खुशी कपूर पदार्पण करत असलेल्या सिनेमाचे नाव अजून ठरलेले नाही. गेल्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचे अकस्मात निधन झाले होते. बॉलिवुडमध्ये श्रीदेवींचा वसा त्यांच्या दोन्ही मुली पुढे चालू ठेवणार असल्याचे यावरून दिसून येते.

 

अहान शेट्टी

 
 
 
 
 

अभिनेता सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टी हा देखील यंदा बॉलिवुडमध्ये पदार्पणाच्या तयारीत आहे. सिनेमाचे नाव अद्याप ठरविण्यात आलेले नाही. ‘RX 100’ या सुपरहिट तेलुगू सिनेमाचा हा रिमेक असणार आहे. याआधी सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी हिने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. आता बहिणीच्या पावलावर पाऊल टाकत अहाननेदेखील बॉलिवुडची वाट धरली आहे.

 

प्रनूतन बहल

 

 
 
अभिनेता मोहनीश बहल यांची मुलगी प्रनूतन बहल यावर्षी बॉलिवुडमध्ये दाखल होत आहे. ‘नोटबुक’ या सिनेमातून ती पदार्पण करत आहे. अभिनेता सलमान खान प्रनूतनला या सिनेमातून लाँच करत आहे. प्रनूतन ही तिच्या आजी नूतनचे नाव राखणार का? हे ‘नोटबुक’च ठरवेल.
 

करण देओल

 
 

 
 

अभिनेता सनी देओलचा सुपुत्र करण देओल पल पल दिल के पासया सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. देओल घराण्याचा वारसा करण देओल पुढे कायम ठेवणार का? हे पाहण्याजोगे ठरेल.

 

मिजान जाफरी

 
 

 
 

विनोदाच्या सॉल्लिड टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता जावेद जाफरी याचा मुलगा मिजान जाफरी लवकरच बॉलिवुडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याच्या सिनेमाचे नाव अजून ठरलेले नाही.

 

राइजिंग डेन्झोप्पा

 
 
 
 

दिग्गज अभिनेते डॅनी डेन्झोप्पा यांचा मुलगा राइजिंग डेन्झोप्पा याचा ‘स्व्कॉड’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

 

करण कपाडिया

 
 

 
 

बॉलिवुड अभिनेत्री डिंपल कपाडियाची बहिण अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचा मुलगा करण कपाडिया हादेखील यावर्षी बॉलिवुडमध्ये पदार्पण सकरत आहे. त्याची आई सिंपल कपाडिया बॉलिवुडमध्ये फार काही कमाल दाखवू शकली नाही. आता करण काय करून दाखवतो, हे त्याचा सिनेमा पाहूनच कळेल. सिनेमाचे नाव अजून ठरवण्यात आलेले नाही.

 
 
 

 

या स्टारकिड्स व्यतिरिक्त अभिनेत्री कतरिना कैफची बहिण इजाबेल कैफ हीदेखील यावर्षी बॉलिवुडमध्ये दाखल होणार आहे.

 
 

 
 

सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री ही ‘दबंग ३’ मधून पदार्पणाच्या तयारीत आहे.

 
 
 

सलमान खानची कथित प्रेयसी यूलिया वंतूर ही ‘राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ या सिनेमातून पदार्पण करत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/