रोहित शेट्टीने रचला 'हा' विक्रम
महा एमटीबी   03-Jan-2019मुंबई : हिंदीमध्ये अॅक्शन चित्रपट म्हणजे रोहित शेट्टी असे समीकरणच बनले आहे. आपल्या चित्रपटांच्या जोरावर रोहितने चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. २०१० ते २०१८ दरम्यान त्याचे ८ चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांनी १०० कोटींचा गल्ला पार करत विक्रम रचला. रोहित शेट्टीच्या या वाटचालीची खरी सुरुवात झाली ती गोलमाल ३ पासून. २०१० मध्ये आलेल्या या चित्रपटाने १६० कोटींची कमाई केली. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिंबा चित्रपटाने केवळ दिवसांत १४० कोटींची कमाई केली आहे.

 
 

रोहित शेट्टीच्या या ८ चित्रपटांनी पार केला १०० कोटींचा गल्ला

१. गोलमाल ३ - १६० कोटी (२०१०)

२. सिंघम - १५० कोटी (२०११)

३. बोलबच्चन - १८७ कोटी (२०१२)

४. चेन्नई एक्सप्रेस - २२६ कोटी (२०१३)

५. सिंघम रिटर्न्स - २१६ कोटी (२०१४)

६. दिलवाले - १५० कोटी (२०१५)

७. गोलमाल अगेन - २०५ कोटी (२०१७)

८. सिम्बा - १४० कोटी * (२०१८)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/