दीपिकाच्या नावाने चालू आहे ‘ही’ खवय्येगिरी
महा एमटीबी   03-Jan-2019

 


 
 
 
अमेरिका : अमेरिकेतील एका या फूडस्टॉलवर अमेरिकन खवय्ये चक्क दीपिका पादुकोणच नावाच्या डोश्याचा आस्वाद घेत आहेत. १० डॉलर किंमतीला हा डोसा या फूडस्टॉलवर विकला जात आहे. रणवीर सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून ही माहिती दिली.रणवीरने या डोश्याच्या मेन्यूकार्डाचा फोटो इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये अपलोड केला होता. पत्नी दीपिकाच्या नावाने विकला जाणारा हा डोसा रणवीर खाल्ला असल्याची ग्वाही त्याने दिली.
 
 

 
 
 
 
 
दीपिकाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एका हॉटेलचे मेन्यूकार्ड शेअर केले आहे. या हॉटेलमध्ये दीपिकाच्या नावाने पराठा विकला जात आहे. या पराठ्याची किंमत ६०० रुपये आहे. दीपिकाच्या नावाने होणारी ही खाद्यपदार्थांची विक्री खुद्द दीपिका आणि रणवीर या दोघांनाही आवडली. सोशल मीडियावर या दांपत्याने याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/