‘टोटल धमाल’चे ‘पैसा ये पैसा’ गाणे प्रदर्शित
महा एमटीबी   29-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : माधुरी दीक्षित-नेने, अनिल कपूर, रितेश देशमुख, अजय देवगण, बोमन इराणी, जावेद जाफरी, जॉनी लिव्हर, अर्शद वारसी अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना पोट धरून हसवायला सज्ज आहे. ‘टोटल धमाल’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या सिनेमातील ‘पैसा ये पैसा’ हे गाणे प्रदर्शित झाले. झटपट खूप पैसे मिळविण्याच्या हव्यासापोटी हे कलाकार एकत्र जमतात. एकमेकांना मागे सारण्याचा प्रयत्न करत त्यांची कशी धमाल उडते. हे या सिनेमात दाखविण्यात आले आहे. ‘टोटल धमाल’ या सिनेमाच्या निमित्ताने माधुरी दीक्षित-नेने आणि अनिल कपूर ही जोडी तब्बल २६ वर्षांनंतर एकत्र पडद्यावर दिसणार आहे.
 
 
 
 

अभिनेता अनिल कपूर या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्यासोबतही २६ वर्षांनी एकत्र काम करत आहेत. याबद्दल अनिल कपूर यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. “आज ‘टोटल धमाल’च्या शुटिंगचा पहिला दिवस, ‘बेटा’ सिनेमानंतर आज २६ वर्षांनी माधुरी आणि इंद्र कुमार यांच्यासोबत मी काम करत आहे. परंतु आजही मला तोच उत्साह आणि तीच ऊर्जा जाणवत आहे.” येत्या २२ फेब्रुवारी रोजी ‘टोटल धमाल’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. ‘धमाल’ या सुपरहिट कॉमेडी सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. सिनेमाचा दुसरा भाग ‘डबल धमाल’ हा देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. सुपरहिट ठरण्याची ‘धमाल’ची ही हॅट्रीक ‘टोटल धमाल’ पुढे कायम राखणार का? ‘टोटल धमाल’ बॉक्स ऑफिसवर किती धमाल करणार? हे पाहण्यासाठी त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/