'ठाकरे' चित्रपटाची गर्जना कायम ; केली एवढी कमाई
महा एमटीबी   28-Jan-2019मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे' हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ढोल-ताशांच्या गजरात चित्रपटाचे स्वागत शिवसैनीकांनी केले. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. पहिल्या दिवशी ६ कोटींची दमदार कमाई करत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर गल्ला जमविण्यास सुरुवात केली आहे. तीन दिवसात २२.९० कोटींचा गल्ला कमावला आहे.

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारत असलेल्या नवाजुद्दीन सिद्दकीला प्रेक्षकांकडून वाहवाही मिळत आहे. तसेच, मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारणारी अमृता राव देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेबांवर तयार करण्यात आलेल्या 'ठाकरे' चित्रपटाचे बजेट हे २० कोटीच्या आसपास होते. खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती केली आहे. तर अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. 'ठाकरे' हा चित्रपट पहिल्याच दिवशी तिकीट बारीवर सुपरहिट ठरला आहे.

 

'मणिकर्णिका'ने देखील कमावले ४२.५५ कोटी

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित असलेला 'मणिकर्णिका' हा चित्रपटदेखील देशभर चांगली कमाई करत आहे. कंगना रनौतने झाशीची राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने भारतभर ४२.५५ कोटींची कमाई केली आहे. दिल्ली, युपी, पंजाब आणि राजस्थान याठिकाणी या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला पहिल्या दिवशी हवी तशी सुरुवात मिळाली नव्हती. पहिल्या दिवशी या चित्रपटाने केवळ ८.७५ कोटींचा गल्ला कमावला होता. मात्र नंतरच्या २ दिवशी तब्बल ३३.८० कोटी कमावून ३ दिवसात आकडा चाळीशी पार गेला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/