‘आनंदी गोपाळ’मधील नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
महा एमटीबी   28-Jan-2019

 

 
 
 
मुंबई : भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित 'आनंदी गोपाळ' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमातील नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. डॉक्टर होण्यासाठी आनंदीबाईंना शिक्षणाची प्रेरणा देणारे त्यांचे पती गोपाळराव जोशी यांची भूमिका या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकरने साकारली आहे.
 
 
 
 

‘वाटा वाटा वाटा गं’ हे या सिनेमातील नवे गाणे असून यापूर्वी या सिनेमातील ‘रंग माळियेला’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. शिक्षणाच्या वाटेवरील आनंदी आणि गोपाळराव या दांपत्याचा खडतर जीवनप्रवास या सिनेमात दाखविण्यात आला आहे. अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद ‘आनंदी गोपाळ’ मध्ये डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या भूमिकेत दिसेल. येत्या १५ फेब्रुवारी रोजी ‘आनंदी गोपाळ’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/