रायडूच्या गोलंदाजीवर आयसीसीची बंदी
महा एमटीबी   28-Jan-2019मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय खेळाडू अंबाती रायुडूवर गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याचे आढळल्यास त्याला १४ दिवसांच्या आत गोलंदाजीची चाचणी द्यावी लागते. मात्र, या १४ दिवसांमध्ये रायुडूने आपल्या गोलंदाजीची चाचणी न दिल्याने त्याला बंदिला सामोरे जावे लागले.

 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान आयसीसीला रायुडूची गोलंदाजी शैली संशयास्पद असल्याचे आढळले होते. त्यानंतर आयसीसीने रायुडूला १४ दिवसांची मुदत दिली होती. मात्र दिलेल्या मुदतीत रायडूने आयसीसीला चाचणी न दिल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या रायुडूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. मात्र, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये खेळू शकणार आहे. तसेच बीसीसीआयची परवानगी घेतल्यानंतरच तो स्थानिक क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकतो, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/