जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
महा एमटीबी   25-Jan-2019


 

हैदराबाद : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी रात्री प्रक्षेपित केलेले मायक्रोसॅट आणि कलामसॅट हे दोन उपग्रह नियोजित कक्षेत यशस्वीरित्या स्थिरावले आहेत. पीएसएलव्ही-सी ४४ या प्रक्षेपकाद्वारे हे उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

 
 

विशेष म्हणजे कलामसॅट हा आतापर्यंतचा वजनाने सर्वांत हलका उपग्रह असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे. या उपग्रहाचे वजन १ किलो २६ ग्रॅम इतके आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा उपग्रह नियोजित कक्षेत स्थिरावला आहे. इस्रोने शुक्रवारी दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. ही वर्षातील पहिली मोहिम आहे.

 
 

श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश तळावरून गुरुवारी रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी हे प्रक्षेपण झाले. या उपग्रहाचा उपयोग रेडिओ कम्युनिकेशनसाठी होणार आहे. कलामसॅट या उपग्रहाची निर्मिती चेन्नईच्या स्पेस किड्स इंडिया या फर्मच्या विद्यार्थ्यांनी केली.

 
 

आतापर्यंत भारतीय विद्यार्थ्यांनी बनवलेल्या नऊ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. मायक्रोसॅट आर हा ७४० किलो वजनाचा असून त्याची खास लष्करी उद्देशांसाठी निर्मिती करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/