कपिल देव यांच्यावर आधारित ‘८३’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर
महा एमटीबी   23-Jan-2019


 
 
 
 
मुंबई : माजी क्रिकेटपटू कपिल देव यांच्या जीवनावर आधारित सिनेमा येणार असून ‘८३’ असे या सिनेमाचे नाव आहे. नुकतीच या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा झाली. ‘८३’ या सिनेमामध्ये अभिनेता रणवीर सिंह हा कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
 

भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. यासाठी भारतीय क्रिकेट संघाने घेतलेली मेहनत आणि वर्ल्डकप जिंकण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास या सिनेमात दाखविण्यात येणार आहे. १० एप्रिल २०२० रोजी अर्थात पुढच्या वर्षी ‘८३’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमासाठी कपिल देव अभिनेता रणवीर सिंहला प्रशिक्षण देणार आहेत.

 

ट्विटरवरून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. ‘८३’ या सिनेमाच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लवकरच या सिनेमातील इतर व्यक्तिरेखांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. असे ‘८३’ च्या सिनेनिर्मात्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

 
 
 

१९८३ साली भारतीय क्रिकेट संघाला मिळालेला ऐतिहासिक विजय ‘८३’ या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातील बॉलिवुड चाहत्यांसहित अनेक क्रिकेटप्रेमींचेही या सिनेमाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. लवकरच सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात करण्यात येईल. अभिनेत्री दीपिका पादुकोण ही या सिनेमाची नायिका असेल. अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/