पाकिस्तानच्या सर्फराजने केली वर्णभेदक टिप्पणी
महा एमटीबी   23-Jan-2019डरबन : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मंगळवारी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आफ्रिकेने ५ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात घडलेल्या एका प्रसंगामुळे पाक कर्णधार सर्फराज अहमद गोत्यात येण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी चालू असताना यष्टीरक्षक असलेल्या सर्फराजने फेलूकव्हायोवर वर्णभेदी टिप्पणी केली, तर त्याच्या आईबद्दलही काही अपशब्द वापरले. सर्फराजचे हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाले. या सगळ्या प्रकारानंतर सर्फराज अहमदवर चौफेर टीका होत आहे. एवढच नाही तर सर्फराजच्या निलंबनाचीही मागणी होत आहे.

 

आयसीसीच्या वर्णभेदी टिप्पणी विरोधी नियमानुसार सर्फराजवर कारवाई होण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या १ ऑक्टोबर २०१२ च्या नियमानुसार आयसीसी आणि त्यांचे सदस्य कोणाचाही त्याची जात, धर्म, संस्कृती, वर्ण, वंश, देश किंवा वंशीय मूळ यावरून अपमान करू शकत नाही. यामुळे आता अंपायर आणि मॅच रेफ्री सर्फराजवर कारवाई करण्याची शक्यता आहे.

 

काय म्हणाला होता सर्फराज?

 

"अरे काळ्या, तुझ्या आईला आज तू कूठे बसवून आलायस, तुझ्या आईला कोणती प्रार्थना करायला सांगितली आहेस?" असे आक्षेपार्ह्य व्यक्तव्य स्टम्पच्या माइकमध्ये रेकॉर्ड झाले आहे. या वक्तव्याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आणि पाकिस्तान संघावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. तसेच सर्फराजवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/