विराट कोहली ठरला हॅट्रीक हिरो!
महा एमटीबी   22-Jan-2019

 

 
 
 
 
नवी दिल्ली : क्रिकेटपटू विराट कोहलीने २०१८ च्या आयसीसी पुरस्कार सोहळ्यात हॅट्रीक केली आहे. ‘सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार’, ‘सर्वोत्कृष्ट वन-डे क्रिकेटपटू’, ‘सर्वोत्कृष्ट कसोटीपटू’ हे तिन्ही मानाचे पुरस्कार यंदा विराट कोहलीला मिळाले. २०१८ मध्ये विराटने वन-डे क्रिकेटमध्ये १३३.५५ च्या सरासरीने १ हजार २०२ धावा काढल्या. ६ शतके आणि ३ अर्धशतके विराटने केली होती.
 
 
 
 
 
एकाच वर्षी आयसीसीचे मानाचे तीन पुरस्कार पटकावणारा विराट हा पहिला खेळाडू आहे. २०१८ या वर्षात विराट कोहलीने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. सचिन तेंडुलकरने केलेला सर्वात जलद १० हजार धावांचा विक्रमही विराटने आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी आणि वन-डे मालिकेमध्ये विराटने भारताला विडय मिळवून दिला. आयसीसीच्या कसोटी आणि वन-डे संघांचेही कर्णधारपद विराट कोहलीला मिळाले आहे.   
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/