‘मेरे गली में’ गली बॉयचे नवे रॅप साँग प्रदर्शित
महा एमटीबी   22-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेता रणवीर सिंहच्या ‘गली बॉय’ या सिनेमाचे ‘मेरी गली में’ हे नवे रॅप साँग प्रदर्शित झाले आहे. यापूर्वी ‘गली बॉय’ या सिनेमाचे टायटल ट्रॅक असलेल्या ‘अपना टाइम आएगा’ गाण्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. ‘मेरी गली में’ या रॅप साँगमध्ये अभिनेता रणवीर सिंहची नवी हिपहॉप स्टाइल दिसून येते. ‘मेरी गली में’ हे गाणे रॅपर डिवाइन आणि नेजीने लिहिले आहे. डिवाइन, नेजी आणि सेज या तिघांनी मिळून हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
 
 
 
 

झोपडपट्टीतील एका गल्लीत या गाण्याचे चित्रिकरण झाले असून गल्लीत राहणाऱ्या लोकांबद्दल, गल्लीतील खास गोष्टींवर आधारित हे गाणे आहे. जोया अख्तर दिग्दर्शित गली बॉय हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. रणवीर सिंह, आलिया भट, कल्कि कोचलिन, अमृता सुभाष हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा रॅपर विवियन फर्नांडिस उर्फ डिवाइन आणि रॅपर नावेद शेख उर्फ नेजी या दोघांच्या जीवनावर आधारित आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/