‘टोटल धमाल’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित
महा एमटीबी   21-Jan-2019

 

 
 
 
मुंबई : ‘टोटल धमाल’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अजय देवगण, अर्शद वारसी, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, जॉनी लिव्हर, रितेश देशमुख, जावेद जाफरी, बमन इराणी, महेश मांजरेकर अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाला लाभली आहे. अनेक विनोदवीर ‘टोटल धमाल’मध्ये असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांना खळखळून हसवणार यात शंका नाही.
 
 
 
 

माधुरी आणि अनिल कपूर ही जोडी अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. ‘क्रिस्टल’ नावाच्या हॉलिवुडच्या माकडीणीने टोटल धमालमध्ये अभिनय केला आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये ही माकडीण अजय देवगणच्या खांद्यावर बसलेली दिसते. यापूर्वी अनेक हॉलिवुडपटांमध्ये या माकडीणीने काम केले आहे. अभिनयाचे प्रशिक्षण क्रिस्टलला देण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/