‘तनू वेड्स मनू ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
महा एमटीबी   21-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता आर. माधवन या दोघांची प्रमुख भूमिका असलेला ‘तनू वेड्स मनू’ या सुपरहिट सिनेमाचा तिसरा भाग लवकरच येणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कंगनाने ही माहिती दिली. २५ जानेवारीला कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ‘तनू वेड्स मनू ३’ ची औपचारिक घोषणा करण्यात येईल. असे कंगनाने म्हटले.
 

२०११ मध्ये प्रदर्शित झालेला तनू वेड्स मनू’ हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. २०१५ साली ‘तनू वेड्स मनू रिटर्न्स’ हा या सिनेमाचा सीक्वेलही हिट ठरला. त्यामुळे ‘तनू वेड्स मनू’ या सिनेमाच्या तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘तनू वेड्स मनू’ या सिनेमाचे दिग्दर्शक आनंद राय हे ‘झिरो’ सिनेमाच्या चित्रिकरणात व्यस्त होते. तसेच कंगनादेखील ‘मणिकर्णिका’चे चित्रिकरण करत होती.

 

त्यामुळे ‘तनू वेड्स मनू ३’ सिनेमाबदद्ल चर्चा होऊ शकली नाही. परंतु लवकरच ‘तनू वेड्स मनू ३च्या कथेवर काम सुरु होईल. अशी माहिती कंगनाने दिली. कंगना सध्या ‘मणिकर्णिका’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘मणिकर्णिका’च्या निमिताने कंगनाने प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेले कंगनाचे ‘सिमरन’ आणि ‘रंगून’ हे दोन्ही सिनेमे दणकून आपटले. कंगनाच्या मणिकर्णिका’कडून तिच्या चाहत्यांच्या खूप अपेक्षा आहेत. यावर्षी कंगनाचे ‘मैंटल है क्या’ आणि ‘पंगा’ हे दोन सिनेमेदेखील प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे कंगनासाठी २०१९ हे वर्ष खास असणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/