पुन्हा होणार ‘टोटल धमाल’!
महा एमटीबी   20-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : अजय देवगण, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख, अनिल कपूर, जॉनी लिव्हर आणि माधुरी दीक्षित अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘टोटल धमाल’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २००७ मध्ये ‘धमाल’ हा सुपरहिट कॉमेडी सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०११ साली ‘डबल धमाल’ या नावाने या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. डबल धमाल प्रेक्षकांवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आता सिनेमाचा तिसरा भाग ‘टोटल धमाल’ बॉक्स ऑफिसवर काय आणि किती धमाल करणार? याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
 
 
 
 

दरम्यान, मी मैत्री बघून, कधीही सिनेमा करत नाही. ‘टोटल धमालया सिनेमाची कथा खूप चांगली आहे. तसेच स्टारकास्टही चांगली आहे. म्हणून मी हा सिनेमा स्वीकारला. यापूर्वी दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्यासोबत मी ‘पुकार’ आणि ‘राजा’ या सिनेमांमध्ये काम केले आहे.” अशी प्रतिक्रिया अभिनेत्री माधुरी दीक्षितने दिली. इंद्रकुमार यांनी ‘टोटल धमाल’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. अभिनेता अर्शद वारसी याने या सिनेमाच्या तिन्ही भागांमध्ये काम केले आहे. सिनेमाविषयी सांगताना अर्शदने म्हटले की, ‘टोटल धमाल’ हा सुपरहिट सिनेमा आहे. ‘गोलमाल’पेक्षाही हा चांगला सिनेमा आहे. यात सगळे चांगले कलाकार निवडण्यात आले आहेत. असे अर्शदने सांगितले. ‘टोटल धमाल’ या सिनेमाचा ट्रेलर येत्या २१ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. तर ‘टोटल धमाल’ या सिनेमा २२ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/