‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’च्या ट्रेलरची युट्यूबवर गडबड
महा एमटीबी   02-Jan-2019

 


 
 
 
मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांच्या ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. परंतु हा ट्रेलर युट्युबवरून अचानक गायब झाला असल्याचे काही नेटिझन्सच्या लक्षात आले. हे खळबळजनक वृत्त कळल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली. अभिनेते अनुपम खेर यांनी या सिनेमात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भूमिका साकारली आहे.
 
 
 
 

युट्युबवर कोणत्याही सामान्य युजरने अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या सिनेमाचा ट्रेलर सर्च केला तर तो दिसणे अपेक्षित आहे. परंतु त्याऐवजी अनुपम खेर यांचे या भूमिकेसंदर्भातील मुलाखतीचे व्हिडिओ युट्युबवर दिसत आहे. सिनेमाचा ट्रेलर या व्हिडिओंच्या यादीमध्ये ५० व्या क्रमांकावर पाहायला मिळतो. काही नेटीझन्सी जाणूनबुझून ही गडबड केल्याचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनुपम खेर यांनी या ट्विटमध्ये युट्यूबच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग करून याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/