ऋषी कपूर यांना कॅन्सर?
महा एमटीबी   02-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : बॉलिवुडमधील सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांना कर्करोगाने ग्रासले असल्याच्या अफवा काही दिवसांपूर्वी पसरल्या होत्या. ‘माझ्या प्रकृतीविषयी नको ते तर्क लावू नका’ असे अभिनेते ऋषी कपूर यांनी स्पष्ट केले होते. परंतु त्यांच्या पत्नी अभिनेत्री नीतू सिंग यांनी इनस्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा या अफवांना बळ मिळाले आहे.
 

३१ डिसेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये कपूर कुटुंबियांनी नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. ऋषी कपूर त्यांची पत्नी नीतू सिंग, मुलगा रणबीर कपूर, त्याची कथित प्रेयसी आलिया भट, मुलगी रिद्धिमा कपूर साहनी, तिचा पती भरत साहनी आणि तिची मुलगी समारा हे सगळेजण पार्टी करत होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कपूर कुटुंबियांच्या या पार्टीला आलिया भटची उपस्थिती लाभल्याने रणबीर आणि आलियाच्या नात्याविषयी अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु ऋषी कपूर यांची पत्नी अभिनेत्री नीतू सिंग यांनी यादरम्यान इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ‘भविष्यात ही कॅन्सर ही फक्त एक रास राहू दे’. असे नीतू यांनी या पोस्टच्या कॅप्शनमधील एका ओळीत लिहिले होते. तसेच सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे. ते सर्वात महत्वाचे आहे. असेदेखील नीतू सिंग यांनी या पोस्टमध्ये लिहिले होते.

 
 
 
 
 

आजारावर वैद्यकीय उपाचार घेण्यासाठी परदेशात असल्याने ऋषी कपूर हे त्यांची आई कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराच्या विधीला उपस्थित नव्हते. या न्यू इयर पार्टीच्या फोटोमध्ये अभिनेते ऋषी कपूर यांचे काळ-पांढरे विरळ केस दिसत आहेत. परंतु एका आगामी सिनेमासाठी माझा हा नवीन लूक आहे. असे त्यांनी ऑक्टोबर महिन्यात ट्विटरवरून स्पष्ट केले होते.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/