‘असा’ दिसतो तानाजींच्या भूमिकेतील अजय देवगण
महा एमटीबी   02-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेता अजय देवगणचा ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तानाजी मालुसरेंच्या शौर्यगाथेवर आधारित हा सिनेमा आहे. नुकताच या सिनेमातील अजय देवगणचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला. या सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत याने हा फर्स्ट लूक ट्विटरवर शेअर केला.
 

या फोटोत हातात तलवार असलेला अजय देवगण दिसत आहे. यावर्षी २२ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी सिनेमाचे एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यामध्ये तानाजी मालुसरे ढालीच्या साहाय्याने स्वत:चे संरक्षण करताना दाखविले होते. या सिनेमामध्ये अजय देवगण सोबत काजोल, सैफ अली खान, सुनील शेट्टी आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार दिसणार आहेत. अभिनेता सैफ अली खानने या सिनेमात औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.

 
 
 

काजोलने तानाजी मालुसरे यांची पत्नी लक्ष्मीबाईची भूमिका साकारली आहे. अभिनेता सुनील शेट्टीने मिर्झा राजे जयसिंह ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमामध्ये शिवाजी महाराजांच्या भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारली आहे. हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. अभिनेता सलमान खानने शिवरायांची भूमिका साकारली असल्याचे बोलले जात असले. तरी याबद्दल सिनेमाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/