'अंदाज अपना अपना'मध्ये हे दोघे दाखविणार आपला अंदाज!
महा एमटीबी   19-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि आमीर खान यांचा एकेकाळी गाजलेला सिनेमा 'अंदाज अपना अपना' नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या रिमेकची सध्या बॉलिवुडमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. परंतु सलमान आणि आमीर या सिनेमाचा भाग नसल्याचे सूत्रांकडून कळले आहे. सलमान आणि आमीरच्या जागी बॉलिवुडमधील दोन नवे चेहरे या सिनेमात दिसणार आहेत. प्रमुख भूमिकेसाठी रणवीर सिंह आणि वरुण धवन या दोन कलाकारांची निवड करण्यात आली आहे.
 
 

 
 

'अंदाज अपना अपना' या सुपहिट सिनेमाला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने विनय आणि प्रीती सिन्हा 'अंदाज अपना अपना' या सिनेमाचा सीक्वेल काढण्याच्या तयारीत आहेत. वरुण धवन आणि रणवीर सिंहला या सीक्वेलसाठी विचारण्यात आले आहे. वरुण धवन आणि रणवीर सिंह हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघेही या सिनेमातील व्यक्तिरेखांना योग्य न्याय देतील, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. परंतु १९९४ साली प्रदर्शित झालेल्या 'अंदाज अपना अपना' सिनेमाचा हा सीक्वेल किंवा रिमेक नसून, नवीन कलाकारांसोबत, एका नव्या अंदाजात, हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/