'मी पण सचिन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
महा एमटीबी   17-Jan-2019

 

 
 
मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशी याचा 'मी पण सचिन' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भारत हा क्रिकेटप्रेमांचा देश, क्रिकेट आणि भारतीय प्रेक्षक यांचे गेली अनेक दशके एक खास नाते आहे. क्रिकेट आणि क्रिकेटप्रेमींचे हेच अनोखे नाते 'मी पण सचिन' या सिनेमाच्या रुपाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे कधीही थांबवू नका. नेहमी आशावादी राहा. असा सकारात्मक संदेश या सिनेमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
 
 

गावात राहणाऱ्या एक क्रिकेटप्रेमी तरुणाची भूमिका अभिनेता स्वप्नील जोशी याने साकारली आहे. हा क्रिकेटप्रेमी तरुण लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहतो. ते स्वप्न साकार करण्यासाठी तो अतोनात प्रयत्न करतो. स्वप्नील जोशी यांने या सिनेमामध्ये तरुण आणि मध्यमवयीन अशा दोन्ही वयोगटातील भूमिका साकारली आहे. अभिजीत खांडकेकर, अविनाश नारकर, अनुजा साठे-गोखले, कल्याणी मुळे, सुहिता थत्ते, प्रियदर्शन जाधव या कलाकारांच्याही या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/