भाऊ कदमच्या 'नशीबवान'ला थिएटर मिळेना!
महा एमटीबी   17-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : महाराष्ट्रातच मराठी सिनेमांना थिएटर मिळण्यासाठी धडपड करावी लागते. 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर', 'भाई : व्यक्ती की वल्ली', 'लव्ह यू जिंदगी' या सिनेमांच्या बाबातीत हेच घडले. आता अभिनेता भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' या सिनेमाच्या बाबतीतही हेच चित्र घडताना दिसतय. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासारख्या मराठीमोळ्या शहरातही या सिनेमांना थिएटर मिळण्यासाठी खटपट करावी लागते.
 

या प्रकाराला आजवर अनेक मराठी कलाकारांनी वाचा फोडली आहे. अभिनेता भाऊ कदम यानेही या प्रकरणी एक फेसबुक पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इतर भाषांमधील सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मराठी भाषिक सिनेमाला दुय्यम स्थान दिले जाते. यावर भाऊ कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मराठी सिनेमांना सिनेमागृहात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत काही मोजकेच शो दिले जातात. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मध्यमवर्गीय नोकरदार माणूस हा कामाच्या ठिकाणी असतो.

 
 
 

त्यामुळे मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळत नाहीत. त्यानंतर मग मराठी सिनेमा पाहायला मराठी प्रेक्षकच येत नाहीत. अशी टीकेची झोड उठवली जाते. भाऊ कदम यांनी आपली ही खंत फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली आहे. ११ जानेवारी २०१९ रोजी भाऊ कदम यांचा 'नशीबवान' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. 'चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील कार्यक्रमात भाऊ कदम डोंबिवलीचा उल्लेख अभिमानाने करतात. परंतु त्याच डोंबिवलीमध्ये भाऊ कदम यांच्या 'नशीबवान' या सिनेमाला पहिल्या आठवड्यात एकही थिएटर मिळाला नाही. असे भाऊ कदम यांनी त्यांच्या या फेसबुक पोस्ट मध्ये नमूद केले आहे. एका दाक्षिणात्य सिनेमाने आठवड्याच्या शेवटी मुंबईत सव्वाशेहून अधिक शो मिळविले. परंतु मराठी सिनेमाला साधा एक शोदेखील मिळू शकलेला नाही. याबबात भाऊ कदम यांनी या फेसबुक पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/