राम मंदिर आंदोलनातील प्रमुख नेता हरपला; विष्णुहरी दालमिया यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |
 
 

मथुरा : राम मंदिरासाठीच्या आंदोलनाचे प्रमुख नेते, विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष आणि वरिष्ठ सल्लागार विष्णुहरि दालमिया यांचे बुधवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. श्रीकृष्ण जन्मस्थान ट्रस्टच्यटा श्रीकृष्ण सेवा संस्थानचे सचिव कपिल शर्मा यांनी ही माहिती दिली. दालमिया या संस्थेचे व्यवस्थापकीय सदस्य होते.

 

कपिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दालमिया यांना २२ डिसेंबर रोजी सकाळी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती नाजुक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. नियमित तपासणीत त्यांच्या फुफ्फुसांना ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. त्यांना कफाचा त्रास होत होता.

 

ते म्हणाले, १४ जानेवारी रोजी त्यांच्या इच्छेनुसार त्यांना गोल्फ लिंक रोड येथील घरी आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या खोलीतच उपचार सुरू केले होते. मात्र, बुधवारी सकाळी वाजून ३८ मिनिटांनी त्यांची अखेरचा श्वास घेतला.

 

९१ वर्षांचे विष्णुहरी दालमिया विश्व हिंदू परिषदेतर्फे ९० च्या दशकातील राम मंदिरच्या निर्माणाच्य़ा आंदोलनात सहभागी झाले होते. डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडल्यानंतर सरकारने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांचेही नाव दाखल करण्यात आले होते.

 

राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनात विहीपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल, आचार्य गिर्राज किशोर यांच्यासह दालमिया यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दालमिया यांचा जन्म मे १९२४ रोजी झाला होता. दीर्घ आजाराशी झुंज देत असताना १६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी वाजून ३८ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@