वरुण धवन साकारणार धीरुभाई अंबानींची व्यक्तिरेखा
महा एमटीबी   16-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या ‘भारत’ या सिनेमामध्ये अभिनेता वरुण धवन हा दिवंगत उद्योगपती धीरुभाई अंबानी यांची भूमिका साकारणार आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत. ४० च्या दशकातील भारत देश या सिनेमामध्ये दाखविण्यात आला आहे.
 

अभिनेता वरुण धवन या सिनेमामध्ये धीरुभाई अंबानी यांची तरुण वयातील व्यक्तिरेखा साकारणार आहे. अली अब्बास जाफर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये ‘भारत’ या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली होती. अबुधाबी, मुंबई, माल्टा, लुधियाना अशा विविध ठिकाणी ‘भारत’ या सिनेमाचे चित्रिकरण सुरु आहे.

 

अभिनेता वरुण धवन ‘भारत’ या सिनेमातील केवळ एका गाण्यात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार, असे बोलले जात होते. परंतु वरुण धवन हा धीरुभाई अंबानी यांची व्यक्तिरेखा साकारत असल्याने त्याची या सिनेमातील भूमिका नक्कीच महत्त्वाची असणार यात शंका नाही. सलमान खानच्या इतर सिनेमांप्रमाणेच यावर्षी ईदच्या दिवशीच ‘भारत’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
वरुण धवन धीरुभाई अंबानी सलमान खान भारत कतरिना कैफ Varun Dhavan Dhirubhai ambani Salman Khan Bharat Katrina khaif