'उरी'ची बॉक्स ऑफिसवर ५० कोटींची कमाई
महा एमटीबी   16-Jan-2019मुंबई : अभिनेता विकी कौशलचा 'उरी-सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित झाला. सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने दमदार कमाई करत अवघ्या चार दिवसात ५० कोटीचा आकडा पार केला आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशलचे काम चित्रपटाचे खास आकर्षण बनत आहे. शिवाय, चित्रपटाची हाताळणी लोकांच्या पसंतीस पडत आहे. चित्रपटाच्या कमाईत पहिल्या दिवशीच्या तुलनेत वाढ होताना दिसत आहे. हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये जाईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

 

'उरी-द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटातून भारतीय सैन्याचे शोर्य आणि सर्जिकल स्ट्राईकचा थरार पडद्यावर उलगडण्यात आलाय. यात विकीने आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर त्याच्या अभिनयाला चाहते भरभरुन दाद देत आहेत. तसेच, चित्रपटामध्ये परेश रावलचेही काम लक्षणीय आहे. तसेच, यामी गौतमी आणि मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारा मोहित रैना यांचेही काम वाहवाही मिळवत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/