बेस्ट संप : नवव्या दिवशीही प्रवाशांचे हाल सुरूच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2019
Total Views |


 


मुंबई : सलग नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. बेस्ट प्रकरणावर सध्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून संपावर काय तोडगा निघतो? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. सलग नऊ दिवस हा बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्यामुळे बेस्टला सुमारे १५ कोटींचे नुकसान झाले आहे. गेल्या ८ जानेवारीपासून ३२ हजार बेस्ट कामगार संपावर असून बेस्टच्या ३७०० बसेस जागीच उभ्या आहेत. यामुळे साधारण ५० लाख प्रवाशांची रोज रखडपट्टी होत आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयात सुनावनीदरम्यान कृती समितीच्या वकिलांकडून कामगारांच्या मागण्यांबद्दल माहिती देण्यात आली. यापूर्वी उच्चस्तरीय समिती आणि कृती समितीबरोबर ३ बैठका पार पडल्या होत्या. या बैठकीत संपावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाली. बैठकीत चर्चा झालेल्या मागण्यांवर कार्यवाही करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत असल्याचे वकीलांनी सांगितले. बेस्ट कर्मचाऱ्यांची पगारवाढ फेब्रुवारी २०१९ पासून देण्यात येईल. मात्र, कुठल्याही एरियस विना ही पगारवाढ देण्यात येईल, असे बेस्टने सांगितले आहे.

 

बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल. याचा पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला होता. मात्र, त्यावर काहीही कारवाई झालेली नसल्याचे स्षटीकरण यावेळी महापालिकेकडून देण्यात आले आहे. विविध मागण्यांसाठी सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे बेस्ट कृती समितीचे शशांक राव यांनी स्पष्ट केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@