चंद्रावर कापूस उगवला हो SSS
महा एमटीबी   16-Jan-2019


 

चीन : चंद्रावरचे पहिले पाऊल मनुष्याने ठेवले आणि इतिहास घडला. अनेक देशांनी आजवर चंद्रयान मोहिमा यशस्वी रित्या पार पाडल्या आहेत. कधी पाणी असल्याचा तर कधी परग्रहवासी असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे. मात्र, आता चंद्रावर कापूसच उगवल्याचा दावा चीनने केला आहे.

 

चीनने नुकत्याच केलेल्या एका चंद्रयान मोहिमेला यश आले असून त्यांनी चंद्रावर पेरलेल्या कापसाच्या बियाणातून अंकुर फुटला आहे. यापूर्वीही स्पेस स्टेशनमध्ये कापसाची लागवड केली गेली आहे. मात्र, चंद्रावर असे रोप उगवण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनने यापूर्वी बटाट्याचीही लागवड केली होती.

 
 
 

चीनच्या अंतरराळ संस्थेने दिली आहे. चीनने पाठवलेल्या चंद्रयानातून ही कामगिरी करण्यात आली आहे. चाहंग-४, असे या मोहीमेचे नाव होते. चाहंग हे चीनच्या एका देवीचे नाव आहे. चीनने यावरूनच चांद्रयान मोहिमेला हे नाव दिले आहे.

 

काय होणार फायदा ?

 

चीनच्या मते, चंद्रावर अशाप्रकारे बीज अंकुरण्यामुळे संशोधकांना तिथे बराचवेळ थांबून संशोधन करता येईल. तिथल्या झाडांवर उपजीवीका केली जाऊ शकते. अंतराळवीरांना अन्न पुरवठा मर्यादीत असल्या कारणाने त्यांना तिथून परतण्यासाठी वेळेची मर्यादा असते.

 
 

थेट चंद्रावर बीज उगवले नाही

 

चंद्राच्या जमीनीवर हे बीज रोवलेले नाही. चंद्रावरील तापमान अनियंत्रित असल्याने तसे करणे शक्य नाही. मात्र, संशोधकांनी एका प्रयोगशाळेत पृथ्वीवरील वातावरणानुसार प्रयोगशाळेतील तापमान नियंत्रित केले जाते. अन्य पोषक तत्वही पुरवली जातात. हे तापमान कधी वजा १७५ ते १०० अंश सेल्सिअंशपर्यंत पोहोचते. या प्रयोगशाळेतील आर्द्रता टीकवून ठेवण्यासाठीही प्रयत्न केले जातात.

 

काही संशोधकांचा विरोध

 

जगभरातील संशोधकांनी यामुळे चंद्रावरील वातावरणावर याचा प्रभाव पडू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. चंद्रावर यापूर्वीही झालेल्या संशोधनातही तिथे कचरा आणि वापरलेल्या वस्तूंचे अवशेष तिथेच सोडण्यात आले आहेत. तिथल्या जैवविविधतेच्या दृष्टीने ते हानीकारक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/