मणिकर्णिकामधील ‘भारत’ हे गाणे प्रदर्शित
महा एमटीबी   16-Jan-2019


 
 
 
 
मुंबई : ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या सिनेमातील भारत हे गाणे प्रदर्शित झाले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई या वीरांगनेच्या शौर्याची गाथा या सिनेमातून दाखविली जाणार आहे. ‘भारत ये रहना चाहिए’ हे असे या गाण्याचे नाव आहे. देशभक्तीपर हे गाणे आहे. देश से है प्यार तो, हर पल ये कहना चाहिए, मैं रहू या ना रहू, भारत ये रहना चाहिए’ असे या गाण्याचे बोल आहेत.
 
 
 
 

गीतकार प्रसून जोशी यांनी या गाणे लिहिले आहे. राणी लक्ष्मीबाईंच्या बालपणीपासून ते त्यांनी लढलेल्या लढाईपर्यंतचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर प्रसून जोशी यांनी #Deshpremjatao हा नवा हॅशटॅग ट्विटरवर सुरु केला. आपल्याला असलेले देशाबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी या हॅशटॅगचा वापर केला जात आहे. येत्या २५ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. अभिनेत्रा कंगणा रनोत हिने या सिनेमात झाशीची राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारली आहे. अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी या कलाकारांच्याही मणिकर्णिकामध्ये प्रमुख भूमिका आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/